भाजपच्या उमेदवारीमुळे दिल्ली महापौरपदाची निवडणूक बनली रंगतदार

भाजपच्या उमेदवारीमुळे दिल्ली महापौरपदाची निवडणूक बनली रंगतदार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिकडेच झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली होती. त्यानंतर 'आप'ने महापौरपदासाठी शैली ओबेरॉय तर उपमहापौरपदासाठी मो. इकबाल यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढविणार नाही, असे संकेत सुरुवातीला भाजपकडून देण्यात आले होते. तथापि पक्षाने मंगळवारी महापौर पदासाठी रेखा गुप्ता तर उपमहापौर पदासाठी कमल बागडी यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपने स्थायी समिती निवडणुकीत कमलजीत सेहरावत, गजेंद्र दराल आणि पंकज लुथरा यांना उमेदवारी दिली आहे. तिकडे आप ने स्थायी समितीसाठी आमिल मलिक, रवींद्र कौर, मोहिनी जिनवाल आणि सारिका चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने महापौरपदासाठी उमेदवारी दिलेल्या रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघाच्या नगरसेविका आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news