अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक भाजपने लढवू नये : राज ठाकरे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

फडणवीस राज ठाकरे
फडणवीस राज ठाकरे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, अशा मागणीचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. एखाद्या मतदारसंघातील आमदाराचे निधन होते. त्या ठिकाणी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. त्यांच्या पत्नीला आमदार करणे, हीच दिवंगत लटके यांच्यासाठी श्रध्दांजली असेल, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची सुरूवात झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षांन ही निवडणूक लढवू नये. आणि त्यांनी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निवडणूक न लढविण्याचे धोरण स्वीकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजली अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं, अस मला माझे मन सांगत आहे. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे, आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. शनिवार 15 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करताना पटेल यांच्यावर असलेले विविध गुन्हे व महापालिका निवडणूक लढवताना दिलेले जातीचे बनावट प्रमाणपत्र याचा उल्लेख पटेल यांनी केला नसल्यामुळे शिवसेनेने आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगाचे शिवसेनेकडून लक्ष वेधून यावेळी आक्षेपही घेण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news