Nagaland Election Results 2023 Result : नागालँड विधानसभेवर पुन्‍हा भाजप-‘एनडीपीपी’ युतीचा झेंडा

Nagaland Election Results 2023 Result : नागालँड विधानसभेवर पुन्‍हा भाजप-‘एनडीपीपी’ युतीचा झेंडा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: नागालँड विधानसभा निवडणुक २०२३ च्या निवडणुकीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप- नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) युतीने बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली आहे. मागील २०१८ विधानसभा निवडणुकीत युतीला मिळालेले यश यंदाही कायम राहिले आहे.

नागालँड विधानसभेसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ६० जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. दरम्यान नागालँडमध्ये १३ लाख मतदार असून, ८२.४२ टक्के मतदान झाले. यामध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) 23 जागांवर विजय नोंदवला आहे तर, भाजपने (BJP) १२ मतदारसंघात बाजी मारली आहे. एनडीपीपी दोन मतदारसंघांमध्‍ये आघाडी असून, या युतीची निर्णायक बहुमत मिळवण्‍याच्‍या  समीप आहे.

नागालँडच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (NDPP) प्रमुख आणि सध्याचे नागालँडचे मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. यापूर्वी रिओ हे चारवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे आणखी एक टर्म मुख्यमंत्रीपदी राहण्याची शक्यता वाढली आहे.

Nagaland Election Results 2023 Result: निकाल 

भारतीय जनता पक्ष – १२
अपक्ष – ४
जनता दल (संयुक्त) – एका जागेवर आघाडी
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) –  २
नागा पीपल्स फ्रंट- २
नॅशनल पीपल्स पार्टी – ७
नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी – २५ विजयी 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) – 2 

निवडणुकीपूर्वीच NDPP-BJP चा 40 : 20 फॉर्म्युला

नागालँड विधानसभा निवडणुक २०२३ पूर्वीच नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) आणि भाजप (BJP) यांची निवडणूकपूर्व युती होती. 40:20 जागा वाटपाच्या आधारावर या दोन्ही पक्षाने ही निवडणूक लढवली होती. नागा पीपल्स फ्रंट (NPF) ने २२ जागा लढवल्या आणि २००३ पर्यंत राज्यात सत्ता गाजवणाऱ्या आणि सध्याच्या सभागृहात एकही सदस्य नसलेल्या काँग्रेसने २३ जागांवर निवडणूक लढवली होती.

२०१८ च्या विधानसभेत NDPP-BJP युती

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी(NDPP) पक्षाने १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर या पक्षाने भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. नागा पीपल्स फ्रंटला २५ जागा जिंकून देखील सरकार स्थापन करता आले नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणूकीत नागा पीपल्स फ्रंट-२५, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी-२१, भारतीय जनता पार्टी-१२, अपक्ष-२ अशा जागांवर यश मिळवले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news