Ramesh Bidhuri : भाजप खासदाराची भर संसदेत बसपा खासदारावर आक्षेपार्ह टिप्पणी, म्हणाले…

Ramesh Bidhuri : भाजप खासदाराची भर संसदेत बसपा खासदारावर आक्षेपार्ह टिप्पणी, म्हणाले…

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत चांद्रयान-3 मोहिमेवरील चर्चेदरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी गुरुवारी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. चर्चेदरम्यान व्यत्यय आणल्यावर बिधुरी यांनी दानिश अली यांचा दहशतवादी असा उल्लेख केला. त्यानंतर बिधुरी यांची आक्षेपार्ह टिप्पणी लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली. याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत खंत व्यक्त केली.

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी चंद्रयान-3 च्या यशावर बोलत होते. त्याचवेळी बसप खासदार दानिश अली यांनी काहीतरी विधान केले. यावर बिधुरी संतापले. प्रत्युत्तरात त्यांनी 'ओय भ*वे… ओय उग्रवादी… क*वे.. ये आतंकवादी है' अशा आक्षेपार्ह शब्दांचा अली यांच्यासाठी वापर केला. त्यांच्या या आक्षेपार्ह शब्दांवर विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला. दानिश अली हे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून निवडून आलेले असून त्यांच्याबद्दल वापरण्यात आलेल्या

अखेर काहीवेळाने या अपशब्दांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली. सिंह यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, जे शब्द उच्चारले गेले ते मी ऐकले असून मी अध्यक्षांना हे शब्द कामकाजातून काढून टाकावे अशी विनंती करत आहे. मी या शब्दांमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या सगळ्यांकडे दिलगिरी व्यक्त करतो. सिंह यांनी दिलगिरी व्यक्त करताच विरोधकांचा राग काहीसा शांत झाला आणि त्यांनीही बाके वाजवून त्यांच्या या दिलगिरीचा स्वीकार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news