शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार; भाजप आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार; भाजप आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच अंधाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, द्वारली गावात एका भूखंडावर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी महेश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली होती. याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांच्या मागे महेश गायकवाड यांचे समर्थकही पोहचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

गणपत गायगवाड यांनी झाडल्या सहा गोळ्या

गणपत गायगवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राहुल पाटील यांनाही एक गोळी लागली. यादरम्यान हर्षल केणी यांनीही रिव्हॉल्वर बाहेर काढली होती, ती वरिष्ट पोलिस निरीक्षक जगताप यांनी लॉक केली. यावेळी झालेल्या झटापटीत जगताप देखील जखमी झाले. जखमींना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news