Lok Sabha Election BJP Manifesto Committee | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘जाहीरनामा’ समिती गठीत; ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी

BJP News
BJP News

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गठीत केलेल्या जाहीरनामा समितीची आज (दि.३०) घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी या समितीची घोषणा केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीत इतर पक्षांतून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांच्या नावांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Election BJP Manifesto Committee)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वप्रथम उमेदवारांची पहिली यादी भाजपनेच जाहीर केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे आणि उमेदवार निश्चितच प्रक्रिया वेगाने सुरू आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या जाहीरनाम्यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज जाहीरनामा समितीची घोषणा केली. (Lok Sabha Election BJP Manifesto Committee)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निमंत्रक म्हणून पक्षाने जाबाबदारी दिली आहे. तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल सह संयोजक आहेत. विविध सदस्यांच्या माध्यमातून जवळपास सर्व राज्यांच्या नेत्यांना या समितीमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे. या समितीमध्ये चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही नावे आहेत. या संदर्भातील माहिती भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Lok Sabha Election BJP Manifesto Committee)

Lok Sabha Election BJP Manifesto Committee : पक्षातील २७ सदस्यांचा समावेश

भाजपच्या या २७ सदस्यी समितीमध्ये जवळपास सर्व राज्यातील नेत्यांना प्रतिनिधित्व दिले आहे. महाराष्ट्रातून पियुष गोयल आणि विनोद तावडे या दोन नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडाअर्जुन राम मेघवाल, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी, राजीव चंद्रशेखर, किरण रीजीजू, भूपेंद्र यादव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वा शर्मा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ज्येष्ठ भाजप नेते रविशंकर प्रसादसुशील मोदी राधा मोहनदास अग्रवालजुल ओरम. पी. धनकडमनजिंदर सिंह सिरसा, अनिल अँटनीतारीक मन्सूर यांचा समावेश आहे.  (BJP Lok Sabha Election)

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news