Neil Somaiya : किरीट सोमय्यांच्या मुलाची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

Neil Somaiya : किरीट सोमय्यांच्या मुलाची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील (Neil Somaiya) यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान हे किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक असल्याचा, तसेच नील यांनी कमी भावात जमीन विकत घेतल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांच्या हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, आज (दि. २५) मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार होती, मात्र त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. यावर आता सोमवारी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे समजते आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. तसेच मुंबई पालिकेच्या कारभारावरही त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. आता शिवसेनेकडून सोमय्या यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. नील सोमय्या (Neil Somaiya) यांचे नाव एका खंडणीच्या प्रकरणात आले होते. हे जुने प्रकरण असून याप्रकरणी नील यांची नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुलुंड पोलिस ठाण्यात नील यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे नील (Neil Somaiya) यांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिस आता कोणती कारवाई करतात, याची उत्सुकता आहे. दरम्यान, अटक होण्याची शक्यता असल्याने नील यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

शिवसेना नेते,खासदार संजय राऊतांचे गंभीर आरोप…

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परीषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पीएमसी बँक घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध असून त्यांचा पुत्र नील हा या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक पदावर काम करत आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे हजारो कोटींचे प्रकल्प उभे केले. हा सगळा पीएमसी बँकेतील पैसा आहे. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या मिळालेल्या नसून राष्ट्रीय हरित लवादाने अॅक्शन घेतल्यास कारवाई होईल, असा इशारा राऊत यांनी दिला होता.

आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली होती. इतकेच नाही, तर पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भारतीय जनता पक्षाला २० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.

'पीएमसी घोटाळ्यातील आरोपीने किरीट सोमय्या यांच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली?', असा सवाल उपस्थित करतानाच या भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, अशा शब्दात राऊत यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. यावेळी राऊत यांनी देवेंद्र लधानी हे नाव घेतले. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन असून त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news