पुणे ग्रामपंचायत Live : दौंडच्या पश्चिम पट्यात भाजपचे वर्चस्व

पुणे ग्रामपंचायत Live : दौंडच्या पश्चिम पट्यात भाजपचे वर्चस्व

राहू : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राहूबेट (ता.दौंड) परीसरातील लक्षवेधी  झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत पाटेठाण व देवकरवाडी, नादुंर, बोरीभडक ,दहिटणे या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंचपदावर भाजपचे आमदार राहुल कुल समर्थकांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात गटाची सत्ता उलथून लावत वर्चस्व प्रस्थापित केले तर दहिटणे ग्रामपंचायतीवर आमदार राहूल कुल समर्थकांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावातून सवाद्य विजयी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी तसेच गुलालाची मुक्तपणे उधळण करत दिवाळी साजरी करत एकच जल्लोष केला.

जनतेमधून थेट सरपंच निवडीच्या निर्णयानंतर प्रथमच राहूबेट परीसरातील पाटेठाण, देवकरवाडी आणि दहिटणे नांदुर या ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या आहेत. देवकरवाडीच्या सरपंचपदी भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक तृप्ती दिगंबर मगर यांनी सोनाली गणेश कुंजीर यांचा 367 मताच्या फरकाने पराभव करत सरपंच प्राप्त केले. नांदुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या रोमहर्षक लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक विशाल नरेंद्र थोरात यांचा भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक युवराज बोराटे यांनी पराभव केला.

तर दहिटणे ग्रामपंचायत सरपंचपदी आमदार राहूल कुल समर्थक आरती गायकवाड १६३ मतांनी विजयी झाल्या. बोरीभडक येथे आमदार राहुल कुल समर्थक कविता बाप्पू कोळपे सरपंचपदी ६६ मतांनी विजयी झाल्या. डाळिंब ग्रामपंचायतच्या सरपंचपदी काँग्रेसचे बजरंग मस्के हे निवडून आलेले आहेत तर दापोडी ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादीचे आबा गुळमे हे निवडून आलेले आहेत. तालुक्यातील आठ पैकी सहा ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून ग्रामपंचायत या विजयामुळे राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news