भारत सरकारने सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी मंगळवारी (२३ फेब्रुवारी) रात्री एक विधेयक येत्या हिवाळी अधिवेशानत (२९ नोव्हेंबर) मांडले जाणार आहे, असे वृत्त आले. क्रिप्टोकरन्सीबाबत मोदी सरकारने केलेल्या या मोठ्या घोषणेमुळे जागतिक पातळीवर क्रिप्टोकरन्सीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर बिटकाॅईनच्या (BTC) किमतीत २६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
बिटकाॅईन सोबत इतरही क्रिप्टोकरन्सीच्या किमती घसरलेल्या आहेत. त्यामध्ये जवळपास २५ ते ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार करणारे डिजिटल प्लॅटफाॅर्म्स सध्या धोक्याच्या पातळीवर काम करताना दिसत आहेत.
क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटचा विचार केला तर बुधवारी (२४ नोव्हेंबर) ९ वाजेपर्यंत बिटकाॅईन (BTC) २५ टक्क्यांनी, इथेरियम २३ टक्के, टीथर ३ टक्क्यांनी आणि यूएसडी काॅईनमध्ये २३ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
भारतात बिटकाॅईनच्या (BTC) किमतीत २५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झालेली असून ३४ लाख ९९ हजार ४६८ रुपये, इथेरियमची किंमत २ लाख ६४ हजार १४० रुपये, टीथरची किंमत ६३ रुपये आणि कारडानोची किंमत १०७ रुपयांपर्यंत गेली आहे.
भविष्याचा विचार करता मोदी सरकार स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर मोदी सरकार सध्याच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी येत्या २९ नोव्हेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 'क्रिप्टोकरन्सी एण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बील 2021', असे विधेयक मांडणार आहे.
मोदी सरकार या विधेयकात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून सरकारी डिजिटल करन्सी चालविण्याचे नियमदेखील बनविणार आहे. एकंदरीत यावर संसदिय समितीमध्ये क्रिप्टोकरन्सीवर चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची सल्ला देण्यात आला आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये धोका अधिक पत्करावा लागतो. असं असूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक त्यात गुंतवणूक करत आहेत. खरंतर क्रिप्टोकरन्सीबाबत गुढता कायम असून क्रिप्टोकरन्सीची सुरूवात कुठून आणि कशी झाली, तसेच क्रिप्टोकरन्सीचं नियंत्रण कुठून केलं जातं, याबाबत कोणालाही माहीत नाही. त्यामुळे मोदी सरकारने क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचाबाबत जो विचार केला आहे, तो चांगला निर्णय आहे, असंही बोललं जात आहे.
हे वाचलंत का?