Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ पोरबंदरच्या जवळ पोहोचले; द्वारकामध्ये समुद्रकिनारी जोरदार वारे

biparjoy cyclone
biparjoy cyclone
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Biparjoy : अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदरच्या जवळ पोहोचले आहे. मध्यंतरी बिपरजॉय चक्रीवादळाचा भारतीय किनारी प्रदेशाला तडाखा बसणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून बिपरजॉय ज्या पद्धतीने पुढे सरकत आहे त्यावरून ते गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात धडकणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. सोबतच गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ अतिशय तीव्र झाले आहे. Biparjoy

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन बिपरजॉय चक्रीवादळ धडकल्यास खबरदारी म्हणून काय काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा आढावा घेतला. दरम्यान आज बिपरजॉय चक्रीवादळ पोरबंदरच्या जवळ पोहोचले आहे. तसेच ते जखाऊ बंदराच्या देखील जवळ पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसात 15 जूनपर्यंत बिपरजॉय चक्रीवादळ जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छला ओलांडून पुढे जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. Biparjoy

#BiparjoyCyclone चा प्रभाव म्हणून द्वारकामध्ये खडबडीत समुद्राची परिस्थिती आणि जोरदार वारे दिसले. द्वारकेतील गोमतीघाटातील दृश्ये एएनआयने दिली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, VSCS (अत्यंत तीव्र चक्री वादळ) #Biparjoy 02:30 IST वर ईशान्य आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर आहे. 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडणे: IMD

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news