बिल गेट्स यांनी ४८ वर्षांपूर्वीचा resume केला शेअर; लिहिली ‘ही’ हृदयस्पर्शी गोष्ट!

बिल गेट्स
बिल गेट्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चांगला रिझ्यूम (resume) कसा असतो? यामध्ये कोणत्‍या गोष्‍टी लिहायच्या असतात? असे अनेक प्रश्न तरुणांच्या समोर उभ्‍या राहतात जेव्हा ते करियरच्या सुरूवातीला आपला रिझ्यूम बनवण्यासाठी बसतात. यावेळी काही लोक आपल्‍या वरिष्‍ठांचीही मदत घेतात. तर अधिकतर लोक हे (Google) ची मदत घेतात. काही लोक प्रसिध्द लोकांचे रिझ्यूम शोधून काढतात आणि त्‍या प्रमाणे आपला रिझ्यूम बनवण्याचा प्रयत्‍न करतात जेणेकरून तो चांगला होईल. अलीकडेच, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी आपला बायोडाटा LinkedIn वर शेअर केला, ता व्हायरल झाला आहे.

बिल गेट्स हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी शुक्रवारी LinkedIn वर त्यांचा 1974 चा रिझ्यूम शेअर केला आणि लिहिले – तुम्ही अलीकडेच पदवीधर असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेला असाल, मला खात्री आहे की तुमचा रिझ्युम माझ्या 48 वर्षांच्या जुन्या पेक्षा खूपच चांगला असेल. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत ९३ हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

बिल गेट्स यांनी शेअर केलेला बायोडाटा 1974 चा आहे, ज्यामध्ये त्यांचे नाव विल्यम एच गेट्स आहे. त्यांनी तो रिझ्यूम हार्वर्डमध्ये त्याच्या पहिल्या वर्षात तयार केला होता. रिझ्युम मध्ये लिहिले त्‍यांनी लिहिलंय – त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कंपाइलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स सारखे कोर्स केले आहेत. त्याला Fortran, Cobol, Algol, Basic अशा सर्व प्रमुख प्रोग्रामिंग भाषांचा अनुभव आहे. त्यांनी 1973 मध्ये TRW Systems Group सह सिस्टम प्रोग्रामर म्हणून त्यांचा अनुभव सांगितला. त्यांनी 1972 मध्ये लेकसाइड स्कूल, सिएटल येथे कॉन्ट्रॅक्‍टर आणि को-पार्टनर म्हणून त्यांच्या कार्यकाळाबद्दलही लिहिले आहे.

लोकांनी 'गुड' आणि 'कूल' रिझ्युम म्‍हटलं आहे…

आता गेट्स यांचा बायोडाटा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. काहींनी त्यांचा रिझ्युम 'चांगला' तर काहींनी 'छान' म्हणून वर्णन केले आहे. त्याचवेळी काही युजर्सनी त्यांचा रिझ्यूम शेअर करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी, असे काही वापरकर्ते आहेत ज्यांनी हा रिझ्यूमला आदर्श श्रेणीमध्ये ठेवले नाही. 'फॉर्च्युन' मधील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बिल गेट्स यांच्या  रिझ्युममध्ये 3 गोष्टी होत्या, ज्या तज्ञांच्या मते नसल्या पाहिजेत. वैयक्तिक तपशीलांमध्ये खूप खोलवर जाणे, विविध क्रियापदांचा अभाव आणि काही निरुपयोगी गोष्‍टी म्‍हटले आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news