पेट्रोल नव्हे, चक्क बीअरवर चालणारी बाईक!

पेट्रोल नव्हे, चक्क बीअरवर चालणारी बाईक!

मिनेसोटा : आजवर एकापेक्षा एक सरस शोध लावणार्‍या अमेरिकेतील के. मशेल्सन या अवलियाने आता चक्क बीअरवर चालणार्‍या बाईकची निर्मिती करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मशेल्सनने यापूर्वी रॉकेटवर आधारित वॉशरूम व जेट संचलित कॉफी पॉटचा शोध लावला आहे.

एरवी, सोशल मीडियावर नवनवे आविष्कार पाहायला मिळत असतात. पण, ही भन्नाट कल्पना प्रथमच प्रत्यक्षात साकारली गेली असू शकते. के. मशेल्सन यांनी या नव्या आविष्कारात गॅस संचलित इंजिनऐवजी हिटिंग कॉईलसह 14 गॅलन केग वापरला असून कॉईल बीअर 300 डिग्रीपर्यंत गरम करत ही बाईक चालवता येते, हे दाखवून दिले आहे.

कॉईल बीअर 300 डिग्रीपर्यंत गरम केल्यानंतर नोजलमध्ये सुपर-हिट स्टीम होते आणि यामुळे बाईक सुरू होते. ही मोटरबाईक निश्चितपणाने अनोखी असून अशी निर्मिती यापूर्वी कोणीच केली नसल्याने याचा आनंद काही वेगळाच आहे, असे मशेल्सन यांनी म्हटले आहे. गॅसच्या किमती वाढत आहेत आणि मी स्वत: ड्रिंक्स घेत नाही. त्यामुळे मी बीअरचा इथे इंधन म्हणून वापर केला, असे ते गंमतीने म्हणाले.

मशेल्सन यांना रॉकेटमन म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी तयार केलेली ही बाईक अनोखीच आहे. अद्याप ही बाईक रस्त्यावर उतरवलेली नाही. मात्र, काही प्रदर्शनात या बाईकला अव्वल पसंती मिळत राहिली आहे. ही बाईक 240 कि.मी. वेगाने धावू शकते, असा दावा मशेल्सन यांनी केला असून याचे परीक्षण लवकरच ड्रॅग स्ट्रीपवर केले जाणार आहे. त्यानंतर काही ठिकाणी प्रदर्शन केले गेल्यानंतर मशेल्सन यांच्या घरातील संग्रहालयात त्याचा समावेश होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news