लालूप्रसाद यादवांच्‍या घरी नातीचे आगमन, तेजस्‍वी यादव-राजश्री यांना कन्‍यारत्‍न

लालूप्रसाद यादवांच्‍या घरी नातीचे आगमन, तेजस्‍वी यादव-राजश्री यांना कन्‍यारत्‍न

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारचे उपमुख्‍यमंत्री तेजस्‍वी यादव आणि त्‍यांच्‍या पत्‍नी राजश्री यादव यांना आज (दि. २७) सकाळी कन्‍यारत्‍नाची प्राप्‍ती झाली. तेजस्‍वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी ट्विटरच्‍या माध्‍यमातून ही माहिती दिली.

आज सकाळी तेजस्‍वी यादव यांच्‍या पत्‍नी राजश्री यांनी मुलीला जन्‍म दिला. यादव कुटुंबातील सर्व सदस्यांनी मुलीच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे. रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवर शेअर केलेल्‍या फोटोमध्‍ये तेजस्‍वी यादव यांनी आपल्‍या मुलीला घेतल्‍याचे दिसत आहे. रोहिणी आचार्य यांनी ट्विटमध्‍ये लिहिलं आहे की, आज देवाने माझ्या घरात आणि अंगणात आनंदाची अशी भेट दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जमिनीच्‍या बदल्‍यात नोकरी प्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने (सीबीआय) माजी रेल्‍वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्‍या निवासस्‍थानी छापे टाकले होते. यावेळी तेजस्‍वी यांच्‍या पत्‍नी राजश्री यांचीही चौकशी करण्‍यात आली होती. या कारवाईनंतर राजश्री यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news