मोठी बातमी | भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांचा मोबाईल हॅक, कॉंग्रेसला मतदान करा असे सांगून मतदारांची दिशाभूल

मोठी बातमी | भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांचा मोबाईल हॅक, कॉंग्रेसला मतदान करा असे सांगून मतदारांची दिशाभूल
Published on
Updated on

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा-  भारतीय जनता पार्टी तथा महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांचा मोबाईल हॅक करण्यात आला असून त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकाचा वापर करून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. एकीकडे मतदान चालू असताना दुसरीकडे थेट उमेदवाराच्या क्रमांकावरून मतदारांची दिशाभूल करणारा असला प्रकार घडवणाऱ्यांची ताबडतोब चौकशी केली जावी आणि कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलकडे दिलेल्या अर्जात केली आहे.

डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या वतीने ही तक्रार देण्यात आली असून सायबर सेल पोलीस आता गुन्हेगारांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान याविषयीची अधिक माहिती देताना उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांनी हा प्रकार घडवला असल्याचा आरोप केला. शिरपूरचे ज्येष्ठ नेते अमरीश भाई पटेल यांच्या मोबाईलला हॅक करून असा प्रकार घडवला गेला होता व त्यांनाही तसले फोन त्यांच्या क्रमांकावरून जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्या पाठोपाठ महायुतीचे उमेदवार स्वतः डॉक्टर हिना गावित यांनाही काँग्रेसकडून भाजपा कार्यकर्त्यांना व मतदारांना तसले फोन जात असल्याचे निदर्शनास आले म्हणून त्यांनी दुपारी याची तातडीने दखल घेतली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, मतदान सुरू झाल्यापासून आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि आमचा होणारा विजय लक्षात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी रडीचा डाव खेळायला सुरू केले. माझ्या मोबाईल नंबर ला हॅक करून माझ्या मोबाईल नंबर वरून लोकांना फोन करून त्यांच्या पक्षाला मतदान करण्याविषयी आवाहन करून लोकांची दिशाभूल करायचं काम पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष करत आहे. यावर मी कायदेशीर कारवाई केलेली आहे. या विषयांमध्ये मी एफ आय आर सुद्धा केलेला आहे, असे नमूद करून डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हे आता अगदी शेवटच्या स्तरावर जाऊन जो रडीचा डाव खेळत आहे. याला नक्कीच जनता कडक उत्तर देईल, असा माझा विश्वास आहे.

तरी आपल्याला जर अशा माझ्या मोबाईल नंबर वरून माझ्या पर्सनल नंबर वरून जर असे फोन आले तर आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. माझ्या मोबाईल नंबर वरून लोकांना चुकीचे कॉल जे जाऊन राहिले आहे हे पूर्णपणे खोटे आहे, असेही डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news