भाजपच्या कंबोज यांना दणका! सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

भाजपच्या कंबोज यांना दणका! सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणातील भाजपचे मोहित कंबोज यांना कनिष्ठ न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने मोठा दणका दिला. अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी जयवंत यादव यांनी या प्रकरणात सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळला.

कंबोज आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध अतिरिक्त कलमांतर्गत गुन्हे नोंदवून नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. तसेच तपास अहवाल सादर करण्याचेही आदेश सीबीआयला दिले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाला सुमारे १०३ कोटी ८१ लाख रुपयांचा मोठा फटका बसला. याचा शोध घेताना फॉरेन्सिक ऑडिटरच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून मोहित कंबोज आणि इतर आरोपींच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाला होता. कंबोज आणि त्यांच्या साथीदारांनी टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ५० कोटी रुपये उकळल्याचे समोर आले. त्यानंतर बँकेचे उपमहाव्यवस्थापक पी. के. जगन यांनी एफआयआर दाखल केला. त्याआधारे सीबीआयने कंबोज व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सीबीआयने तपास केल्यानंतर खटला चालविण्यासाठी सबळ पुरावे नसल्याचे स्पष्ट करत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयवंत यादव यांच्या न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. दंडाधिकारी न्यायालयाने या रिपोर्टची गंभीर दखल घेतली आणि पुन्हा तपासाचे आदेश दिले.

या गुन्ह्यात मूळ खरेदी- विक्री व्यवहार नाहीत. इक्विटी शेअर कॅपिटल- मधील विसंगती, बुडीत कर्ज, इक्विटी कॅपिटलसंबंधी अटींची पूर्तता नसणे, निधी अन्यत्र वळवून अफरातफर करणे याचे सबळ पुरावे असल्याचे स्पष्ट करत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर नाराजी व्यक्त करत तो फेटाळून लावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news