Bharat Biotech : भारत बायोटेकला मोठा धक्का; WHO ने थांबविले Covaxin वितरण

Bharat Biotech : भारत बायोटेकला मोठा धक्का; WHO ने थांबविले Covaxin वितरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेने ( डब्ल्युएचओ ) भारत बायोटेकच्या कोरोना लसीचे अर्थात कोव्हॅक्सीनचे संयुक्त राष्ट्र एजन्सीद्वारे होणारा पुरवठा बंद करण्यात आला आहे. निरीक्षणातून आढळेल्या चूका दुरूस्त न केल्यामुळे हा निर्णय घेण्‍यात आला आहे. इतकंच नाही तर, 'डब्ल्युएचओ'ने कोव्हॅक्सीन खरेदी करणाऱ्या देशांनाही भारत बायोटेकवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीवर कोणती कारवाई होईल, हे मात्र स्पष्ट नाही.

यासंदर्भात 'डब्ल्युएचओ'ने सांगितले की, "कोव्हॅक्सीन प्रभावी आहे. त्याबद्दल कोणतीच शंका नाही. मात्र निर्यातीसाठी उत्पादनाला स्थगिती दिली, तर त्याच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. हा निर्णय १४ ते २२ मार्चपर्यंत घेण्यात आलेल्या डब्ल्युएचओने पोस्ट इमरजेन्सी यूज लिस्टिंग निरीक्षणाच्या अहवाल येईपर्यंत लागू आहे."

यापूर्वी भारत बायोटेकने सांगितले होते की, "आम्ही आमचे सर्व मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये कोव्हॅक्सीनचे उत्पादन कमी करत आहोत. खरेदी करणाऱ्या एजन्सींना जो काही पुरवठा करायचो होतो, तो आम्ही पूर्ण केला आहे. मागणीसुद्धा कमी होण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत उत्पादन कमी करण्याचा निर्यण घेतला आहे."

 "येणाऱ्या काळात कंपनी देखभाल, प्रक्रिया आणि अनुकूल सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करेल. कोरोना लसीकरण दरम्यान मागील एका वर्षात सातत्याने यूनिटमधून कोव्हॅक्सीनची निर्मिती होत होती. त्यामुळे युनिट्समध्ये काही अनुकूल आणि अद्यावयात बदल करणे आवश्यक आहेत", असेही भारत बायोटेकने स्‍पष्‍ट केले आहे.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news