मुंबई : ‘एनसीबी’ची मोठी कारवाई! विमानतळावर 2.80 किलो कोकेन जप्त; दोन परदेशी महिलांनाअटक

एनसीबी
एनसीबी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये एनसीबीने कोकेन जप्त करण्यात आली आहे. तसेच दोन परदेशी महिलांना अटक केली आहे.

एनसीबीला आंतरराष्ट्रीय सिंडिकेटद्वारे मुंबईत ड्रग्जच्या पुरवठयाविषयी माहिती मिळाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तपासदरम्‍यान मरिंडा एस. नावाच्या दक्षिण आफ्रिकन महिलेबाबत माहिती मिळाली. यानंतर रविवारी (दि.20) आदिस अबाबा, इथियोपिया येथून मुंबईला विमान प्रवास करणार असल्‍याची माहिती मिळाली. त्यानुसार, एनसीबीचे अधिका-यांनी मुंबई येथील  सीएसएमआय विमानतळ त्या महिलेला पकडण्यासाठी सापळा तयार केला.

विमानतळावर या महिलेची ओळख पटल्‍यानंतर तपासणी करण्यात आली. तपासादरम्‍यान तिच्याकडे 2.800 किलो कोकेन आढळले. हे कोकेन विविध आकाराच्या 08 पॅकेटमधील, 2 जोड शूज, 2 पर्समध्ये विशेष पोकळी तयार करून लपवण्यात आले होते. तसेच तिच्याकडून दारूही जप्त करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान तिने अधिका-यांना सांगितले की, ती मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये एका व्यक्तीच्या ताब्‍यात द्यायचे आहे. यानंतर एक टीम हॉटेलमध्ये जावून आफ्रिकन महिलेला अटक केली. दोन्ही महिलांची कसून चौकशी करण्यात आली यावेळी या दोन्ही महिला कोकेन मुंबईत वितरित करणार होत्‍या, असे त्‍यांनी एनसीबीच्या अधिका-यांना सांगितले.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news