पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी संघटना हमास विरोधात इस्त्रायलला 'स्वसंरक्षणाचा अधिकार' आहे, असा पुनरुच्चार करणारे संयुक्त निवेदन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह अनेक प्रमुख पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रमुखांनी जारी केले आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गाझावर जमिनीवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. (Israel-Hamas War)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये इस्रायलच्या हमासच्या विरोधात स्वसंरक्षणाच्या अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहेदरम्यान, इस्रायली सैन्याने रविवारी हमासचे वर्चस्व असणार्या गाझा पट्टी आणि दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले वाढवले आहेत. तसेच सीरिया आणि व्याप्त वेस्ट बँकमधील लक्ष्यांचा समावेश करण्यासाठी हल्ले वाढवले आहेत.
इस्त्रायलच्या मित्र राष्ट्रांनी इस्रायलच्या हद्दीत अभूतपूर्व हल्ला करणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेविरोधात स्वत:चा बचाव करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचे पुन्हा एकदा समर्थन केले. दरम्यान, 'रॉयटर्स'ने दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या हवाई हल्ल्यात ११७ मुलांसह २६६ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.