Bhima Koregaon Case: प्रा. शोमा सेन यांच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाची सहमती

Bhima Koregaon Case: प्रा. शोमा सेन यांच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाची सहमती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने इंग्रजीच्या प्राध्यापिका आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यास अनिरुद्ध बोस आणि न्या. एस. व्ही. एन भट्टी यांच्या खंडपीठाने सहमती दर्शवली आहे. वैद्यकीय आधारावर त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 17 जानेवारीच्या आदेशाला याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने जामिनासाठी सेन यांना त्यांच्या प्रकरणावर सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयात संपर्क करण्याचे निर्देश दिले होते.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारासह नक्षलवाद्यांसोबत कथित संबंधांच्या आरोपाखाली 2018 पासून सेन तुरूंगात आहेत. हे प्रकरण याप्रकरणातील सह आरोपी गोंसाल्वेस आणि फरेरा यांच्यासारखे आहे का? असा सवाल न्या. बोस यांनी सेन यांची बाजू मांडणारे अँड. ग्रोवर यांना विचारला. परंतु, हे प्रकरण त्याहून गंभीर आहे. सेन यांना तुरूंगात ठेवण्याचे कुठले कारण नाही. त्या पाच वर्षांहून अधिक काळापासून तुरूंगात आहे. खटला अद्याप सुरू झालेला नसून आरोप देखील निश्चित करण्यात आलेले नसल्याचे ग्रोव्हर यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news