Bhagya Dile Tu Mala : कावेरी घेईल का नोकरी करायचा निर्णय?

कावेरी
कावेरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमाला यांची नवी सुरुवात आपण पाहतो आहे. राजवर्धन मोहिते जो 'माहेरचा चहा' हा बिझनेस सांभाळायचा तो आता एका कंपनीत नोकरी करतोय. या कंपनीत त्याची टीम लीडर किमया ही त्याला खूप संभाळून घेते. (Bhagya Dile Tu Mala) राजने किमयाला कावेरी आणि रत्नमालाला सुद्धा भेटवलं आहे. आता कावेरी आणि किमया खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. (Bhagya Dile Tu Mala)

संबंधित बातम्या –

किमया कावेरीला बोलते हे घर छोटं नाही पडत का? पण राजच्या २५ हजार पगारात ह्यापेक्षा मोठं घर कसं परवडणार असं कावेरी म्हणते तेव्हा किमया तिला नोकरी करण्याचा सल्ला देते, रत्नमाला ही सहमत होते पण राज कावेरीला नोकरी करण्यासाठी परवानगी देईल का? राजला हा निर्णय आवडेल का? याचा विचार कावेरी करते. आता कावेरी नोकरी करेल की नाही? हे जाणून घेण्यासाठी 'भाग्य दिले तू मला' , महारविवार, २८ जानेवारी, दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. पाहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news