पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी सकाळी मोतीबाग या संघ कार्यलयात सरसंघचालक मोहन भागवत, केंदीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंदीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप आणि संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवी यांचे पार्थिव बंगरुळू येथुन सोमवारी मध्यरात्री पुण्यात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी 7 पासूनच भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची अत्यंदर्शन घेण्यास गर्दी झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी 8 वाजता अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. 10.45 वाजता अमित शहा यांचे आगमन झाले. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर देवी यांचे पार्थिव वैकुंठधामकडे नेण्याची तयारी सुरू झाली.