राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष पदी माझी निवड केली असून ही निवड मी सार्थ ठरवीन. कात्रजच्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन संघाचे दूध संकलन वाढविणे आणि आर्थिक घडी सुरळित करुन संघाच्या नावलौकिकात भर टाकण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांचे अधिकाधिक आर्थिक हित साधण्यास माझे प्राधान्य असेल.– भगवान पासलकर , अध्यक्ष, कात्रज दूध संघ, पुणे.