Sambhaji Bhide | संभाजी भिडे पुन्हा वादात! सांगलीत तिरंगा ऐवजी काढली भगवा पदयात्रा

संभाजी भिडे
संभाजी भिडे
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा, पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सांगलीत (मंगळवार) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने तिरंगा ऐवजी भगवा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये संभाजी भिडे (Sambhaji Bhide) देखील सहभागी झाले होते.

वादग्रस्त वक्तव्यामुळे संभाजी भिडे राज्यात सध्या चर्चेत आहेत. त्यांना राज्यभरातून टिकेला सामोरे जावे लागत आहे. सांगलीत देखील पुरोगामी संघटनांनी भिडे यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी तिरंगा ध्वजासह भगवा ध्वजाचा देखील सन्मान व्हावा, अशी मागणी केली. त्यामुळे अनेकांनी याला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस आणि श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी नियम व अटी घालून पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी दिली होती. त्यानुसार सांगली शहरात काल (मंगळवारी) पदयात्रा काढण्यात आली. यावेळी धारकार्‍यांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Sambhaji Bhide)

हेही वाचा :   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news