Bengal Culture Durga Puja : बंग संस्कृतीतील दुर्गापूजा

बंग संस्कृतीतील दुर्गापूजा
बंग संस्कृतीतील दुर्गापूजा

बंग संस्कृतीतील दुर्गापूजा प्रसिद्ध आहे. भारतातील अन्य प्रदेशांत साजरे होणारे नवरात्र आणि दसरा यांना जोडूनच दुर्गोत्सव असतो. या उत्सवातील मुख्य देवता मोठ्या टपोऱ्या डोळ्यांची आणि गोबऱ्या गालांची, देखणी दुर्गा आहे; पण तिच्यासह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांचीही पूजा असते. (Bengal Culture Durga Puja) बंगाली आणि ओडिया परंपरांमध्ये या चार देवता दुर्गादेवीची मुले मानली जातात. आपल्या मुलांना घेऊन दुर्गा आपल्या माहेरघरी येते, असे मानले जाते. त्यामुळे बंगाली लोकगीतांमध्ये 'आगमनी गान' नावाची विशेष प्रकारची गाणी आढळतात. दुर्गेच्या येण्याचे कौतुक या गीतांमध्ये असते.

शरद ऋतूत येणाऱ्या दुर्गेचे स्वागत करताना एखादा लोकगीतकार म्हणतो, 'शारद प्रभाते आलोर बीना, बाजलो रे ओयि बाजलो रे, महामायेर आगोमोने, शाजलो भुबन शाजलो रे' म्हणजे, 'शरदाच्या पहाटवेळी, प्रकाश किरणांच्या तारा छेडल्या गेल्या आहेत. महामायेच्या स्वागतासाठी पूर्ण भुवन सजलेले आहे.' (Bengal Culture Durga Puja)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news