बेळगाव : सौंदत्ती येथे रेणुका देवीच्या यात्रेसाठी प्रशासन सज्ज

बेळगाव : सौंदत्ती येथे रेणुका देवीच्या यात्रेसाठी प्रशासन सज्ज

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेला सोमवारपासून (दि.५) प्रारंभ होत आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून याच दिवशी सायंकाळी देवीचा कंकण मंगळसूत्र विसर्जनोत्सव कार्यक्रम होणार आहे. तर ९ डिसेंबरला यात्रेची सांगता होणार आहे.

या यात्रेसाठी जवळपास आठ लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाकडून स्वच्छतेसह इतर पायाभूत सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सुमारे एक हजार दुकाने उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे रेणुका देवीची यात्रा स्थगित करण्यात आली होती. पुरुष आणि महिलासाठी स्वतंत्र स्नानगृहाची उभारणी करण्यात आली आहे. शौचालये, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची सोय करण्यात आली आहे. जवळपास आठ ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ५०० तात्पुरते शौचालये उभारण्यात आली आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news