बेळगाव : ट्रक पलटी झाल्याने चोर्ला घाटातील वाहतूक ठप्प

चोर्ला घाट
चोर्ला घाट
Published on
Updated on

खानापूर, (बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला मार्गावरील चोर्ला घाटात मालवाहू ट्रक पलटी झाला. त्‍यामुळे आज (रविवार) सकाळपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोव्यातील अंजुना धरणापासून दहा किलोमीटर अंतरावर पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

दोन्ही बाजूने वाहनांच्या घाटात लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. अडथळा दूर करण्यासाठी गोवा पोलिसांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. हेमाडगा मार्गावरील मणतुर्गा गेटवर रेल्वे कडून सुरू असलेल्या रस्ता कामामुळे सध्या अनमोड मार्ग बंद आहे. त्यामुळे चोर्ला मार्गे वाहनांची संख्या वाढली होती. आज रविवार असल्यामुळे गोव्याहून मोठ्या संख्येने प्रवासी खरेदीसाठी बेळगावला येतात. या अपघातामुळे त्यांना घाटातच अडकून पडावे लागले. गोव्याचा प्रवास करणाऱ्या लोकांना आता रामनगरमार्गे वाहतूक करावी लागत आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news