BCCI President Election : रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्‍यक्ष, काेषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

BCCI President Election : रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्‍यक्ष, काेषाध्‍यक्षपदी आशिष शेलार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (BCCI President Election) अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी  जय शहा  तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली आहे.

'बीसीसीआय' पदाधिकारी निवडणुकीसाठी दि. ११ आणि १२ ऑक्‍टोबर रोजी अर्ज दाखल झाले. १३ ऑक्‍टोबर अर्जांची छाननी झाली. आज मुंबईतील ताज हाॅटेलमध्‍ये निवडणूक पार पडली. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली होती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले होते. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. सौरव गांगुली यांनी २३ ऑक्‍टोबर २०१९ रोजी बीसीसीआय अध्‍यक्षपदाची धुरा संभाळली होती. तर २४ ऑक्‍टोबर २०१९ रोजी जय शाह यांनी सचिवपदाची सूत्रे स्‍वीकारली होती. दोघांचाही कार्यकाळ ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये संपणार होता.

उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला, सचिवपदी जय शहा यांची फेरनिवड

पदाधिकारी निवडीसाठी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील ताज हॉटेलमध्‍ये बैठक झाली. यावेळी ध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी  जय शहा  तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली. तर संयुक्‍त सचिवपदी देवाजीत सैकिया तर आयपीएल चेअरमनपदी अरुण धूमल यांची निवड झाली आहे.

रॉजर बिन्नी यांची कारकीर्द

अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी २७ कसोटी सामन्‍यांमध्‍ये ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. रॉजर बिन्नीने २७ कसोटीमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी यांचा १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होते. १९८३  विश्वचषक स्‍पर्धेत त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news