पुढारी ऑनलाईन : बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्युमेंट्री प्रदर्शित केल्यापासून विविध पातळीवर वाद निर्माण झाला आहे. यावर आता अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ता नेड प्राइस याविषयी विचारले असता, ते म्हणाले तुम्ही ज्याविषयी विचारत आहात, त्याविषयाशी मी परिचित नाही. तर अमेरिका आणि भारत या दोन्ही संपन्न आणि लोकशाही देशांमध्ये सामायिक मूल्यांशी मी परिचित आहे. अमेरिकेचे भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत.
एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ते म्हणाले, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भारतासोबत अमेरिकेची वैश्विक धोरणात्मक भागिदारी मजबूत करतात. यामध्ये राजकीय, आर्थिक आणि जनतेशी असलेलेल संबंध याचा समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नेड प्राईस यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांना रेखांकित केले. भारताच्या लोकशाहीला जिवंत म्हणत त्यांनी म्हटले आहे की, आम्ही अशा काही गोष्टींना बघतो की, जे आम्हाला एकत्र बांधतात आणि आम्ही अशा तंत्वांना मजबूत करण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत आहेत. या दोन्ही देशांच्या लोकशाहीमध्ये जी सामायिक मूल्ये आहेत, त्यावर आम्ही भर देणार असल्याचेही नेड प्राईस यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले आहे.
गेल्या आठवड्यापासून बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरून वाद निर्माण झाल्यावर अमेरिकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या वादातून स्वत: बचावात्मक पवित्रा घेतला आहे. याविषयी बोलताना ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, भारताच्या मांडण्यात आलेल्या या चित्रणाशी मी सहमत नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत मांडलेल्या वादग्रस्त माहितीपटावर सुनक यांनी ही टिप्पणी केली.