मोठी बातमी ! बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य दोघांचे राजीनामे

मोठी बातमी ! बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य दोघांचे राजीनामे
Published on
Updated on
बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट यांच्यासह तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर आणि प्रीतम पहाडे या चौघांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष आदेशानुसार हे राजीनामे दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनाम्यासंबंधी सूचना केली होती, त्यानुसार राजीनामे दिल्याची माहिती पुढे येत आहे.
गतवर्षी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर अध्यक्षपदाची जबाबदारी सातव यांच्याकडे आली होती. त्यांनी संचालक मंडळ, अधिकारी वर्गाच्या सहकार्याने थकीत कर्ज वसूलीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यामुळे गत आर्थिक वर्षात बॅंकेने भरीव कामगिरी केली. एनपीए लक्षणीयरित्या कमी केला, बॅंकेच्या नफ्यात भरघोस वाढ केली. अशी स्थिती असताना अचानक पक्ष नेतृत्वाकडून राजीनामे देण्यास सांगितल्याने बारामतीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
संचालक मंडळाच्या पूनर्रचनेसाठी हे राजीनामे घेतले गेले आहेत. अध्यक्षपदी सातव हे कायम राहतील तर उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला अथवा महिला संचालिकेला संधी मिळेल असेही बोलले जात आहे. बारामती सहकारी बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी गेले वर्षभर सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अथक परिश्रम केले होते. बँकेने यंदा सात कोटी नव्वद लाखांचा निव्वळ नफा मिळविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news