पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अबूधाबी’मधील हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण

BAPS Hindu Mandir
BAPS Hindu Mandir
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येमध्ये सोमवारी २२ जानेवारीला रामलल्ला प्रतिष्ठापणा सोहळा पार पडत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आहेत. दरम्यान, परदेशातील आणखी एका हिंदू मंदिराच्या उद्धाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (BAPS Hindu Mandir)

संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे आणखी एका हिंदू मंदिराचे बांधकाम सुरू आहे.  पंतप्रधान मोदी यांना १४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या अबुधाबी येथील BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले असून, त्यांनी ते स्वीकारले आहे, असे बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने सांगितल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे. (BAPS Hindu Mandir)

अबुधाबीतील BAPS हिंदू मंदिराची वैशिष्टये

अबुधाबीमध्ये बांधण्यात येत असलेल्या BAPS हिंदू मंदिर बांधकामासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे मंदिर वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेपासून प्रेरित गुलाबी वाळूचा दगड आणि संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिरातील उत्‍कृष्‍ट  कोरीवकाम आणि शिल्पे भारतातील कारागिरांच्या मदतीने तयार केली गेली आहेत. यूएईमधील BAPS हिंदू मंदिर हे स्थापत्य कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर कारागिरांनी इतक्या मजबूतपणे बांधले आहे की 1000 वर्षे त्याला काहीही होणार नाही. BAPS मंदिराच्या रचनेत सात शिखरे अधोरेखित करण्यात येणार आहेत. त्या प्रत्येकावर UAE चे चिन्ह असेल. मंदिर संकुलात मुलांसाठी वर्गखोल्या, प्रदर्शन केंद्र आणि खेळाचे मैदानही आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news