केळामुळे मेंदू, हृदयाचे आरोग्य राहते चांगले!

केळामुळे मेंदू, हृदयाचे आरोग्य राहते चांगले!

नवी दिल्ली : रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येत नाही असे म्हटले जाते. हीच बाब केळाबाबतही खरी आहे. केळाच्या नियमित सेवनाने आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. विशेषतः हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी केळ लाभदायक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

केळामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ते गुणकारी ठरते. काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की शरीरात जर पोटॅशियमचे प्रमाण कमी होऊ लागले तर रक्तदाब वाढू लागतो. केळात 'ब' जीवनसत्त्वही असते जे मेंदूसाठी लाभदायक आहे. 'व्हिटॅमिन बी 6' हे मेंदूला नेहमी सक्रिय ठेवण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे मेंदूची क्षमता कमी होणे सुरू होते. ज्यावेळी आपल्या शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन संयुगांची कमतरता असते त्यावेळी निद्रानाशाची समस्या निर्माण होते. केळाच्या सेवनाने शांत झोप येण्यास मदत होते. केळातील मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते. डोळ्यांसाठीही केळाचे सेवन लाभदायक ठरते. केळातील 'व्हिटॅमिन-बी 6' आणि कार्बोहायड्रेटस् शरीराला ऊर्जा देतात तसेच कॅल्शियम हाडे व दात मजबूत करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news