धुळ्यात काँग्रेसमधील नाराजी नाट्य दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई

धुळ्यात काँग्रेसमधील नाराजी नाट्य दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई

धुळे पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या संदर्भात नाराजी नाट्य संदर्भात आज धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या समवेत पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी चर्चा केली आहे. त्या आधारावर नाराजी दूर होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर या संदर्भात दोन दिवसात शिंदखेडा तालुक्यात बैठक घेऊन या पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे मत शाम सनेर यांनी व्यक्त केले आहे.

धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. मात्र ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा पाठवला .गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून आपण काँग्रेसच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर सरळ सरळ टीका करीत असताना आणि उमेदवारीसाठी इच्छुक असताना पक्षाने अन्याय केला असल्याची भूमिका व्यक्त करून त्यांनी हा राजीनामा दिला .त्या बरोबरच नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला. मात्र काँग्रेसने शेवाळे यांचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे आज धुळ्यात होणाऱ्या आदिवासी मेळाव्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे हजेरी लावणार असल्याने सनेर यांच्या संदर्भात काय निर्णय होतो .याकडे प्रत्येकाचे लक्ष लागून होते. मेळावा संपल्यानंतर सनेर यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ,कार्याध्यक्ष कुणाल पाटील आणि अन्य नेत्यांनी श्याम सनेर आणि त्यांच्या समर्थकांसमवेत चर्चा केली. यावेळी समर्थकांनी सनेर यांच्यावर अन्याय झाला असून त्यांना उमेदवारी देणे अपेक्षित असल्याचे मत मांडले. या बैठकीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेसच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष श्याम सनेर हे काम करीत आहेत. त्यांची उमेदवारीची देखील इच्छा होती. पण पक्षांच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होणे ,ही स्वाभाविक बाब आहे. मात्र काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम केलेला असल्याने सनेर हे काँग्रेस बरोबरच राहतील. तसेच त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला .तर शाम सनेर यांनी देखील दोन दिवसात कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत शिंदखेडात बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये आपण कार्यकर्त्यांच्या वतीने भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. या सर्व नाराजी नाट्यावरून थोरात यांनी सनेर यांचे मन वळवले असल्याचे प्राथमिक अवस्थेत दिसत असून भविष्यात काँग्रेसच्या माध्यमातून शोभा बच्छाव यांची उमेदवारी कायम ठेवली जाणार असल्याचे संकेत देखील थोरात यांनी दिले आहेत.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news