‘बाहुबली’ फेम अभिनेते सत्यराज यांना कोरोनाची लागण

actor satyraj
actor satyraj
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

बॉलीवूडसोबतचं आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पा नावाने ओळखले जाणारे दाक्षिणात्य दिग्गज स्टार सत्यराज यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याआधी सत्यराज होम आयसोलेशनमध्ये होते.

त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकृतीत सुधारणा झाली नसल्‍याने  त्यांना ७ जानेवारी रोजी, शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यासंदर्भात सत्‍यराज यांच्‍याकडून  कुठलीही अधिकृत माहिती किंवा स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही.

दिग्गज अभिनेते sathyaraj तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपट बाहुबलीमध्ये कटप्पाच्या भूमिकेने त्यांना संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवून दिली.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news