अन् रुखसानाची बनली रुक्मिणी! ..धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन ऐकल्यानंतर केले धर्मांतर

अन् रुखसानाची बनली रुक्मिणी! ..धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन ऐकल्यानंतर केले धर्मांतर

पाटणा; वृत्तसंस्था :  धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बाबा बागेश्वर धाम यांची प्रवचने ऐकून बिहारमधील रुखसाना या युवतीने सनातन हिंदू धर्माचा स्वीकार केला असून, तिचे नामकरण आता रुक्मिणी असे करण्यात आले आहे.
भारताचेच काय घेऊन बसलात, मी पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवून दाखवेन, अशी व यासारख्या वक्तव्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सतत चर्चेत असतात. आता त्यांचे प्रवचन ऐकून एका मुस्लिम तरुणीने धर्मांतर केल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. रुखसाना ऊर्फ नौशीन परवीन ही 22 वर्षांची असून, ती मुजफ्फरपूरची रहिवासी आहे.

वैशाली येथील रोशन कुंवर (वय 25) या युवकासह 2018 मध्ये रुखसानाही जयपूर येथील एसआरपीएस कॉलेजमध्ये शिकायला होती. तिथेच दोघांची मैत्री व मग या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. रोशनने लग्नासाठी रुखसानाला कोणतीही अट घातलेली नव्हती. यादरम्यान रुखसाना यूट्यूबवर धीरेंद्र शास्त्रींची प्रवचने ऐकत असे. त्यांची प्रवचने व त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व पाहून रुखसाना भारावून गेलेली होती आणि तिनेच रोशनकडे लग्नापूर्वी मला सनातन हिंदू धर्म स्वीकारायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली.

रोशनच्या आई-वडिलांनी या लग्नाला होकार दिला; पण रुखसानाच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. रोशनसह रुखसानाने हाजीपूर येथे गंडक नदीत बुडी मारली. नदीतून बाहेर आल्यानंतर रुखसाना रुक्मिणी बनलेली होती. दोघांनी मग हिंदू परंपरेनुसार रविवारी वैशाली येथील लालगंजमधील अर्धनारीश्वर महादेव मंदिरात सप्तपदी घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news