पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार – टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट बडे मिया छोटे मिया १० एप्रिल रोजी रिलीज होणार होता. (Bade Miyan Chote Miyan ) या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस क्लॅश अजय देवगनचा चित्रपट मैदानशी होणार होता. आता रिपोर्टनुसार, दोन्हीही चित्रपट पोस्टपोन होऊन ११ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.(Bade Miyan Chote Miyan )
रिपोर्टनुसार, बडे मिया छोटे मिया १० एप्रिल ऐवजी ११ एप्रिलला ईद दिवशी रिलीज करण्यात येईल. सोबतच चित्रपटाचे रन टाईम देखील कमी करण्यात आले आहे. आधी हा चित्रपट २ तास ३६ मिनिटांचा होता, आता रन टाईममध्ये ७-८ मिनिटे कमी करण्यात आले आहेत. बडे मिया छोटे मियाचे आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ९ हजार तिकिट बूक झाले आहेत, ज्यातून ३० लाख रुपयांचे कलेक्शनचे अनुमान आहे. य चित्रपटाचे भारतात ३ हजार शोज ठावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मैदान आतापर्यंत २७०० शोजसाठी ६ हजार तिकिट विक्री झाले आहेत, यातून २० लाखांची कमाई होऊ शकते.