Babar Azam : कोल्ह्याला द्राक्षे आंबट..!

Babar Azam : कोल्ह्याला द्राक्षे आंबट..!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' अशी आपल्याकडे म्हण प्रसिद्ध आहे, तशीच काहीशी परिस्थिती पाकिस्तानी खेळाडूंची आहे. आयपीएलमध्ये खेळायला मिळत नसल्याने या स्पर्धेला नावे ठेवण्याची किंवा कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने आयपीएलपेक्षा बीबीएल (बीग बॅश लीग) चांगली असल्याचा शोध लावला आहे. (Babar Azam)

सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग 2023 चा थरार रंगला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील पेशावर झाल्मीचा संघ एलिमिनेटर सामन्यात पोहोचला आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी पेशावरच्या संघासमोर इस्लामाबाद युनायटेडचे आव्हान आहे. (Babar Azam)

या सामन्यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान बाबरला आयपीएल आणि बिग बॅश लीगशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्याने असे उत्तर दिले जे चाहत्यांना अपेक्षित नव्हते. अँकरने बाबरला विचारले की त्याला कोणती लीग जास्त आवडते इंडियन प्रीमियर लीग की बीग बॅश लीग? बाबर आझम आयपीएलचे नाव घेईल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती, पण त्याने बीबीएलला त्याची आवडती लीग म्हणून पसंती दिली. तसेच बीग बॅश लीगमधून खूप काही शिकण्यासारखे असते, मात्र आयपीएलमध्ये सोपी खेळपट्टी असते, असेही बाबर आझमने सांगितले.

बाबरचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलपेक्षा बीबीएल फेव्हरेट असल्याचे म्हणतो. मात्र, त्याचे उत्तर भारतीय चाहत्यांना आवडले नाही आणि त्यामुळेच बाबर आझमला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news