बाहुबली : क्राऊन ऑफ ब्लड – भल्लालदेव-बाहुबलीची न सांगितलेली कथा यादिवशी पाहता येणार

बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड
बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिस्नी+ हॉटस्टार यांनी हॉटस्टार स्पेशल बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड, या सिनेमाचा प्रिक्वेल आणला आहे. यात बाहुबली आणि भल्लालदेव त्‍यांच्‍यासाठी सर्वात मोठा धोका असलेला क्रूर सरदार रक्तदेवापासून महान महिष्मती साम्राज्याचा आणि राजसिंहासनाचा बचाव करण्यासाठी एकत्र येतात. ग्राफिक इंडिया आणि अर्का मीडियाची निर्मिती असलेली बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड महान निर्माते एस. एस. राजमौली, शरद देवराजन आणि शोभू यर्लागड्डा यांची कलाकृती आहे. त्याचे दिग्दर्शन जीवन जे. कांग आणि नवीन जॉन यांनी केले आहे. या महाकथेतून प्रेक्षकांना महाकाव्य साहस, बंधुता, विश्वासघात, संघर्ष आणि वीरतेची न सांगण्‍यात आलेली कथा अनुभवण्‍यासोबत बाहुबलीचे अॅनिमेटेड युग पाहायला मिळेल.

ही पॉवर पॅक्ड मालिका १७ मे २०२४ पासून डिस्नी+ हॉटस्टारवर उपलब्ध असेल. बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लडचे संकल्पक आणि निर्माते एस. एस. राजमौली म्हणाले, "बाहुबलीचे जग खूप व्यापक आहे. ही कथा बाहुबली आणि भल्लालदेव यांच्या आयुष्यातील अनेक ट्विस्ट्स समोर आणेल आणि त्याचबरोबर एक विसरले गेलेले सिक्रेटही येईल. कारण या दोघांना मिळून महिष्मतीला वाचवावे लागेल. बाहूच्या चाहत्यांसाठी हे एक नवीन कथानक आणताना तसेच ही गोष्ट ॲनिमेटेड स्वरूपात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे."

बाहुबली : क्राऊन ऑफ ब्लडचे सहनिर्माते, लेखक आणि निर्माते शरद देवराजन म्हणाले, एस. एस. राजमौली यांची खास कथाकथनाची शैली बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड ही एक ॲनिमेटेड ॲक्शनने भरपूर कथा आहे. त्यात राजकीय सूड, नाट्य, धोका, युद्ध, हिरोईझम, निष्ठा आणि साहस हे सर्वच आहे. हा गौरव बॅनर्जी यांच्यासोबतचा आणि डिस्ने+ हॉटस्टारसोबतचा लिजेंड ऑफ हनुमाननंतरचा माझा दुसरा ॲनिमेशन प्रोजेक्ट आहे.

बाहुबलीची भूमिका करणारा अभिनेता प्रभास म्हणाला,"भल्लालदेव आणि बाहुबली या बाहुबलीच्या अभूतपूर्व प्रकरणात एकत्र येणार आहेत, ही रोमांचक गोष्ट आहे. बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड ही कथा चित्रपटात घडलेल्या कथेच्या आधी घडलेली आहे."
बाहुबलीः क्राऊन ऑफ ब्लड डिस्नी+ हॉटस्टारवर १७ मे २०२४ पासून पाहता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news