Ayushman Bharat : आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ कार्ड प्रत्येकाकडे असणार; ‘आरोग्य डेटा’ मिळणार एका क्लिकवर

Ayushman Bharat : आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ कार्ड प्रत्येकाकडे असणार; ‘आरोग्य डेटा’ मिळणार एका क्लिकवर
Published on
Updated on

कोल्हापूर; डॅनियल काळे :  केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकाचे आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ कार्ड (Ayushman Bharat) काढण्यात येणार आहे. या कार्डमुळे रुग्णालयात काढण्यात येणारा केसपेपर बंद केला जाणार आहे. त्याऐवजी हे हेल्थ कार्डच वापरले जाणार आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाची आरोग्यविषयक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तत्काळ उपचार करणे सहज, सोपे होणार आहे.

आरोग्य  विभागामध्ये तंत्रज्ञानामुळे क्रांतीच झाली आहे. तळागाळातील लोकांनाही या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबर 2021 पासून ही नवी योजना (Ayushman Bharat) जाहीर केली आहे. कोणत्याही खासगी, सरकारी रुग्णालयात गेले की, सुरुवातीला केसपेपर काढला जातो.

या केसपेपरवर डॉक्टर त्या रुग्णाच्या आजाराच्या नोंदी करतात. तसेच त्याच्यावर कोणते उपचार सुरू आहेत, कोणती औषधे सुरू आहेत, त्याची आरोग्यविषयक स्थिती काय आहे, याच्या नोंदी ठेवतात. रुग्ण पुन्हा केव्हाही रुग्णालयात गेला की, त्याचा पूर्वीचा केसपेपर काढून हिस्ट्री तपासली जाते. आता या सर्व नोंदी केंद्र सरकारच्या डिजिटल मिशन योजनेंतर्गत (Ayushman Bharat) निघणार्‍या हेल्थ कार्डमध्ये अपडेट केल्या जाणार आहेत. आधार कार्डप्रमाणेच या हेल्थ कार्डसाठी युनिक क्रमांक दिला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत डिजिटल हेल्थ कार्ड (Ayushman Bharat) काढण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत, तर शहरी भागात महापालिका, नगरपालिका यांच्यामार्फत कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागात 30 लाख, तर शहरी भागात 16 लाख लोकांना हे कार्ड दिले जाणार आहे. या कार्डवर क्यूआर कोड असणार आहे. तो स्कॅन केल्यानंतर त्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे डिजिटल हेल्थ कार्ड हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने हे कार्ड लवकर काढावे, यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

डिजिटल हेल्थ कार्ड आरोग्य कर्मचार्‍यांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. हे कार्ड काढताना प्रत्येकाची माहिती त्यात नोंदवायला हवी. प्रत्येकाचा आजार, त्रासाचे स्वरूप, निदान केलेले अहवाल, कुटुंबाचे स्वरूप, आर्थिक स्थिती, याचीही माहिती भरणे अपेक्षित आहे. जिल्हा आरोग्य विभागाने अशी 1 लाख 30 हजार परफेक्ट डिजिटल हेल्थ कार्ड तयार केली आहेत.
– डॉ. उत्तम मदने,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news