Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावर आयुष शर्माने दिली मोठी प्रतिक्रिया

salman khan -Aayush Sharma
salman khan -Aayush Sharma

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर आयुष शर्माने आता प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, सलमानच्या मेहुण्याने हा कुटुंबासाठी 'कठीण काळ' असल्याचे म्हटले. 'आम्ही त्याचे कुटुंब आहोत. आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. आणि आम्ही सर्व, एक कुटुंब म्हणून एकत्र उभे आहोत,' असे आयुषने मुलाखतीत सांगितले.


त्याने चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. आयुषने या प्रकरणावर आणखी काही बोलण्यास टाळाटाळ केली. तो म्हणाला की, 'आता मी यावर बोलणे योग्य नाही. कारण ही गंभीर परिस्थिती आहे. सक्षम मुंबई पोलिसांनी ते जे काही करत आहेत ते करण्यात उत्तम काम केले आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरु आहे. म्हणून, मी फक्त धन्यवाद म्हणेन, ज्यांनी त्यांचे प्रेम आणि प्रार्थना पाठवल्या आहेत.'
दरम्यान, असे वृत्त आहे की, सलमान जून २०२४ मध्ये 'सिकंदर' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. दुसरीकडे आयुष शर्मा करण एल. बुटानीच्या आगामी 'रुस्लान' चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news