Ayodhya Cleanliness campaign : PM माेदींचा १४ जानेवारीपासून अयाेध्‍या ‘स्वच्छता’ मोहिम संकल्‍प

Ayodhya Cleanliness campaign :  PM माेदींचा १४ जानेवारीपासून अयाेध्‍या ‘स्वच्छता’ मोहिम संकल्‍प
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राम मंदिर उद्‍घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनगरी स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत अयोध्येला सर्वात स्वच्छ शहर बनवण्याचे आवाहन केले आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की,  देशभरातील जनतेला विनंती आहे की, १४ जानेवारीपासून म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवसापासून छोट्या तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवावी.

व्हिडिओतून संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी अयोध्येतील बंधू-भगिनींना सांगतो, तुम्हाला देश आणि जगातील असंख्य पाहुण्यांसाठी तयार राहावे लागेल. आता देशभरातून आणि जगभरातून लोक अयोध्येत रोज येत राहतील. त्यामुळे रामनगरी हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्याचा संकल्प अयोध्येतील जनतेला घ्यावा लागेल. ही स्वच्छ अयोध्या ही अयोध्यावासीयांची जबाबदारी आहे.

१४ ते २२ जानेवारीपर्यंत मोहीम

'मी देशभरातील जनतेला विनंती करतो की, भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील लहान-मोठ्या सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. मकर संक्रांतीच्या, एक आठवडाआधी 14 जानेवारीला ही मोहिम राबवण्यात येईल. १४ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल, असेही पंतप्रधान माेदींनी म्‍हटले आहे.

प्रभू राम सर्वांसाठी

पंतप्रधानांनी या व्हिडिओमध्ये, 'भगवान राम सर्वांचे आहेत. प्रभू राम येत असताना आपले एकही मंदिर, एकही तीर्थक्षेत्र अस्वच्छ होऊ नये असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news