avocado : एवोकॅडो स्मरणशक्तीसाठीही उपयुक्त

avocado : एवोकॅडो स्मरणशक्तीसाठीही उपयुक्त
Published on
Updated on

नवी दिल्ली : आपल्या देशात आता किवी, ड्रॅगन फू्रटसारखी फळेही लोकांच्या आहारात रूळू लागली आहेत. त्यामध्येच एवोकॅडो या फळाचाही समावेश आहे. या फळाकडे एक 'सुपरफूड' म्हणूनच पाहिले जाते. आरोग्यासाठी हे फळ अत्यंत लाभदायक ठरते. आता तज्ज्ञांनी म्हटले आहे की तीक्ष्ण स्मरणशक्तीसाठीही हे फळ गुणकारी आहे.

लहान मुलांची स्मरणशक्ती, बौद्धिक विकास चांगला व्हावा अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यासाठी हे फळ लाभदायक ठरू शकते. एरव्ही बदामासारखा सुका मेवा कमजोर स्मरणशक्तीवर उपाय मानला जातो. दुधाबरोबर बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारू शकते.

त्यासाठी एवोकॅडोही अतिशय लाभदायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच्या सेवनाने मेंदूवर सकारात्मक प्रभाव पडतो. या फळात व्हिटॅमिन सी, ई, फॉलिक अ‍ॅसिड, पोटॅशियम, कॉपर, आयर्न, मँगेनीज आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स असते व ते एखाद्या कॉम्प्लेक्स ब्रेन बूस्टरप्रमाणेच काम करते. अंड्यामुळेही स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. अंड्यातील 'व्हिटॅमिन बी 12' व 'व्हिटॅमिन बी 6' मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news