Automobile Industry : वाहन उद्योगात रोजगार वाढीची संधी

Automobile Industry : वाहन उद्योगात रोजगार वाढीची संधी
Published on
Updated on

गत 2022 हे वर्ष सर्वद़ृष्टीने घालमेलीचे आणि उलाढालीचे ठरले. (Automobile Industry) कोरोनाच्या धक्क्यातून अजूनही अनेक देश सावरलेले नसले तरी भारताने मात्र मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून जिद्दीने कोरोनावर मात केली.

2022 मध्ये प्रामुख्याने त्यात वाहन उद्योग, इंजिनिअरिंग, माहिती विज्ञापन क्षेत्र (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली. देशातील ऑटोमोबाईल (Automobile Industry) इंजिनिअरिंग संशोधन आणि विकासाची (आर अँड डी) बाजारपेठ जवळपास 4 लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. ग्लोबल रिसर्च फर्म टॅप्लोच्या मते, 2016 मध्ये आर अँड डीची बाजारपेठ 1.85 लाख कोटी रुपये होती. ती पुढच्या पाच वर्षांत 2021 अखेर 3.4 लाख कोटी रुपये झाली. या पार्श्वभूमीवर चालू वर्षाच्या अखेरीस या व्यवसायाची एकूण बाजारपेठ 12.67 टक्के वाढून 3.90 लाख कोटी रुपयांवर जाईल असे वाटते.

वाहन उद्योगातील मर्सिडिझ बेंझ, बॉश, डेमलर, हर्मन, फोर्ड मोटर्स या प्रमुख कंपन्यांनी आणि ऑटो टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हायडरनी देशातच संशोधन आणि विकासकेंद्रे (आर बँड डी) सुरू केली आहेत. त्यामुळे 1 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. जगातील प्रमुख वाहन उद्योग भारतात आपली पावले रोवायला उत्सुक आहेत. त्यांच्या मते जगभरातील सर्वात कुशल, बुद्धिमान मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात भारतात उपलब्ध आहे. कारण औद्योगिक प्रशिक्षण (Automobile Industry) भारतात मोठ्या प्रमाणावर दिले जाते. त्यासाठी केंद्र सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. येत्या दोन वर्षांत वाहन उद्योग दुप्पटीने वाढेल व तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील, असा अंदाज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

येत्या वर्षात वाहतूक मंत्रालय 5 लाख कोटी रुपयांचे या क्षेत्रातील प्रकल्प हाती घेणार आहे. त्यापैकी 2 लाख कोटी रुपये केंद्र सरकार देणार असून उरलेली रक्कम भांडवली बाजारातून व बँकांकडून दिल्या जाणार्‍या कर्जातून उभारली जाईल. बँकांचाही व्यवसाय त्यामुळे बर्‍याच प्रमाणात वाढेल. 2030 पर्यंत म्हणजेच पुढील 8 वर्षांत बहुतेक वाहने अपारंपरिक (पेट्रोल, डिझेल खेरीज अन्य) इंधनावर चालतील. म्हणजेच बायो इथेनॉल, बायो सीएन जी, बायो एल एन जी आणि हरित हायड्रोजन हे भविष्यकाळातील महत्त्वाचे इंधन असेल, असे श्री. गडकरी यांनी सांगितले.

भारताची गणना जगातील मोठ्या निर्यातदारांमध्ये व्हावी, यासाठी केंद्र सरकार हरित हायड्रोजनच्या उद्योगाला प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे. (Automobile Industry)या उद्योगाच्या वाढीसाठी केंद्र सरकार 2.2 अब्ज डॉलरची म्हणजे 180 अब्ज रुपयांची मदत देण्याचा विचार करत आहे.

सन 2022 अखेर वाहनविक्रीला उठाव मिळाला आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा असूनही वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारात विक्रमी 37.93 लाख वाहनांची विक्री झाली. 2022 अखेर मारुती सुझुकी, ह्युदाई आणि टाटा मोटर्स या कंपन्यांनी सर्वाधिक वाहनांची विक्री केली. त्यापाठोपाठ टोयाटो किर्लोस्कर आणि स्कोडा यांनीही वाहनांची(Automobile Industry) विक्रमी विक्री केली.

2016 मध्ये केंद्र सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करून नवीन छापलेल्या नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यातून बराचसा काळा पैसा वापरातून नाहीसा होईल, असा अंदाज होता. कल्पक व धाडसी गुंतवणूकदारांनी (Automobile Industry) यावरही मात केली आणि विविध मार्गांनी अवैध पैशाचे रूपांतर वैध चलनात केले. नोटाबंदीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने 4 विरुद्ध 1 या बहुमताने मागच्या आठवड्यात वैध ठरवले.

कोळसा, खते, पोलाद, सिमेंट, ऊर्जा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे पायाभूत क्षेत्रातील उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मधील वाढ 5.4 टक्क्यांवर गेली असून 2021 नोव्हेंबरमध्ये ती 3.2 टक्क्यांवर होती. सरकारी आकडेवारीनुसार कोळसा उत्पादनात नोव्हेंबर 2022 मधील वाढ 12.3 टक्के, खते उत्पादनात 6.4 टक्के, पोलादामध्ये 10.8 टक्के वाढ झाली.

देशातील औद्योगिक उत्पादन मागील 13 महिन्यांच्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये उच्चांकी स्तरावर पोहोचले. एस अँड पी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (Automobile Industry) अर्थात पीएमआय डिसेंबर 2022 मध्ये 57.8 या अंकांवर पोहोचला आहे. पण नोव्हेंबर 2022 मध्ये पीएमआय 55.7 वर होता. कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात पीएमआय 50 अंकांच्यावर असेल तर ते क्षेत्र विस्तारले आहे, असे मानले जाते.

रशिया आणि चीन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी झाल्यामुळे मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. आता लग्नसराईमुळे या वाढीचा फटका विवाहेच्छुकांना बसेल. मंगळवारी 3 जानेवारीला सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 55,580 रुपयांच्या जवळपास गेला. किरकोळ स्तरावर मात्र तो 10 गॅ्रमला 56000 रुपये ते 57000 रुपये या दरम्यान राहिला.

जागतिक फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ इंग्लंड, डॉयरो बँक, स्विस बँक अशा सारख्या मध्यवर्ती बँका आपले व्याज दर घटवण्याच्या मनस्थितीत आहेत. स्टेट बँकेच्या अहवालानुसार अर्थव्यवस्था व वित्तीय बातम्यांचे नुकसान न होता महागाईवर नियंत्रण ठेवता याचे यासाठी त्यांची ही योजना आहे.

रिझर्व्ह बँकेतर्फे देशातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासू बँकांची यादी जाहीर करण्यात आली. (Automobile Industry)त्यात स्टेट बँक, आयसीआय सीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे.

कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला (Automobile Industry) पुन्हा उभारी आली आहे. याचे प्रत्यंतर सेेवाक्षेत्राच्या वाटचालीत डिसेंबर 2022 मध्ये दिसून आले. सेवांची वाढलेली मागणी, नव्या सेवांच्या संधी आणि अनुकूल बाजार यांची परिणती म्हणून सेवा क्षेत्राची घोडदौड झाल्याचे दिसून येत आहे, असे एस अँड पी ग्लोबलने म्हटले आहे.

नव्या गुंतवणुकीसाठी स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यांचा विचार करायला हरकत नाही. वर्षभरात हे शेअर्स 25 टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसावेत.

डॉ. वसंत पटवर्धन 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news