Australian Open : नदालचा विजयासाठी संघर्ष, ड्रीपरने झुंजवले

Australian Open : नदालचा विजयासाठी संघर्ष, ड्रीपरने झुंजवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : गतविजेता आणि अव्वल मानांकित राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी दिली. त्याने आपल्या पहिल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या 21 वर्षीय जेक ड्रॅपरचा पराभव 7-5, 2-6, 6-4, 6-1 असा केला. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या सामन्यात ड्रीपरने तगडे आव्हान उभे केले. त्यामुळे बावीस वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियनला विजय मिळवण्यासाठी घाम गाळावा लागला.

नदालने सुरुवातीचा सेट जिंकला, पण या सेटमध्ये त्याला ड्रिपरने कडवी झुंज दिली. युवा ड्रिपरने दुसरा सेट 2-6 असा जिंकून नदालला झटका दिला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये स्पॅनिश खेळाडूने आपला अनुभव पणाला लावला आणि हा सेट 6-4 असा जिंकला. चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी विजयासाठी झुंज दिली. अखेर नदालने या सेटमध्ये बाजी मारून सामन्यावर आपली मोहोर उमटवली आणि पुढची फेरी गाठली.

नदालने 13 वर्षांनंतर गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. याचबरोबर त्याने पुरुष एकेरीतील सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम केला. यानंतर फ्रेंच ओपन जिंकून त्याने हा आकडा 22 वर नेला. सध्या, त्याच्यापाठोपाठ सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आहे. ज्याच्या नावावर एकूण 21 ग्रँडस्लॅम आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news