8 वर्षांच्या तरुणाकडे फोर्ब्स’ची मालकी

8 वर्षांच्या तरुणाकडे फोर्ब्स’ची मालकी
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगभरातील सर्वात श्रीमंतांची यादी बनवणार्‍या फोर्ब्स मासिकाची माहिती आता सर्वदूर पोहोचलेली आहे. या जगप्रसिद्ध मासिकातील मोठा हिस्सा 28 वर्षीय अब्जाधीश ऑस्टिन रसेल यांनी खरेदी केला आहे. ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपनी 'ल्युमिनार टेक्नॉलॉजीज'ने फोर्ब्स ग्लोबल मीडिया होल्डिंग्समध्ये 82 टक्के हिस्सा विकत घेतला असून मीडिया हाऊस कंपनीचा सौदा 800 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 6,640 कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचे समोर आले आहे.

एका अहवालानुसार कंपनीतील 82 टक्के हिस्सा ऑटोमोटिव्ह टेक अब्जाधीश रसेल यांच्याकडे असेल, तर उर्वरित 18 टक्के भागभांडवल फोर्ब्स कुटुंबाच्या मालकीचे असेल. अब्जाधीश ऑस्टिन रसेलच्या होल्डिंगमध्ये त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीच्या उर्वरित भागाचा समावेश आहे, ज्याने 2014 मध्ये हाँगकाँग-स्थित गुंतवणूकदार समूह इंटिग्रेटेड व्हेल मीडिया इन्व्हेस्टमेंटस्ला कंपनीची 95 टक्के विक्री केली होती. दरम्यान, ऑस्टिन रसेल कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होणार नसून अधिग्रहणासाठी भांडवल लुमिनारमधील त्यांच्या स्टेकपासून स्वतंत्र आहे, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, ऑस्टिन रसेल या करारासाठी वित्तपुरवठा कसा करत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फोर्ब्स ही अमेरिकेतील सर्वात जुन्या मीडिया कंपन्यांपैकी एक असून फोर्ब्सने प्रकाशित केलेले मासिक जगभरात 5 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, फोर्ब्स अमेरिकन मीडिया, टेक आणि एआय तज्ज्ञांसह कंपनीमध्ये नवीन बोर्ड देखील जोडेल, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय विधानानुसार फोर्ब्स मीडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स देखील कंपनीतील कामकाज पाहतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news