औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब जमदाडे ‘लाचलुचपत’च्‍या जाळ्यात

file photo
file photo

पैठण; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब जमदाडे यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना बिडकीन पोलीस ठाण्याच्या परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (दि. ७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. या कारवाईने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ बडोदा या शाखेचा एका प्रकरणाचा तपास औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरु आहे. या तपासात बिडकीन परिसरातील एका तक्रारदारास सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब जमदाडे यांनी लाच देण्याची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी दुपारी ठरल्याप्रमाणे बिडकीन पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ३ हजार रुपये लाच घेताना जमदाडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news