दिवंगत नेते विनायक मेटे यांची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न

vinayak mete
vinayak mete
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांची विमाननगर भागातील सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेटे यांच्या मुलाने याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार मेटे यांची बहीण आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष विनायक मेटे (वय 20, रा. कोरेगाव पार्क) याने विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची आत्या सत्यशीला महादेव जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश (दोघे रा. ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदनिकेची कागदपत्रे मेटे यांच्या पत्नीच्या नावावर होती. जाधव यांनी सदनिकेचे कुलूप तोडून बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मेटे यांचा मुलगा आशुतोष याने दिली आहे. मेटे यांनी मृत्यूपूर्वी विमाननगर भागातील गंगापूरम सोसायटीत सदनिका खरेदी केली होती. मेटे यांनी ही सदनिका बहीण सत्यशीला आणि भाचा आकाश यांना भेट दिली होती, असा दावा जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news