KL Rahul Athiya Shetty Getting Married : केएल राहुल आथिया शेट्टी लवकर अडकणार विवाह बंधनात

KL Rahul Athiya Shetty Getting Married : केएल राहुल आथिया शेट्टी लवकर अडकणार विवाह बंधनात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यानुसार बॉलिवूडचा स्टार सुनील शेट्टी (Suniel Shetty) याची मुलगी आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेट पटू केएल राहूल (KL Rahul) येत्या तीन महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे दोघे देखील गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे अनेकवेळा एकत्र असेलेल फोटो वायरल झाले आहेत. (KL Rahul Athiya Shetty Getting Married)

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

खरेतर या गोष्टीची अजून अधिकृत स्पष्टता झालेली नाही. पण, सोशल मीडियामध्ये या बातमीने जोर धरला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार हे दोघे पुढील तीन महिन्यात लग्न करतील. या दोघांच्या कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरु असल्याची माहिती पुढे येत आहे. केएल राहुल याचे आई-वडिल याच करिता अलिकडे मुंबईमध्ये आले होते. (KL Rahul Athiya Shetty Getting Married)

राहुलवर जर्मनीत करण्यात आली शस्त्रक्रिया (KL Rahul Athiya Shetty Getting Married)

अलीकडे केएल राहुल हा उपचारा करिता जर्मनी येथे गेला होता तेव्हा त्याच्या सोबत आथिया देखील गेली होती. दुखापतीमुळे राहुल हा सध्या इंग्लंड दौऱ्यात जावू शकला नाही. जर्मनीमध्ये केएल राहुल याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली असून त्याला पुर्णपणे बरे होण्यासाठी अद्याप एक महिन्याहून अधिक काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान त्याची काळजी घेण्यासाठी आथिया देखिल राहुल सोबत होती.

मुंबईत घेतले घर (KL Rahul Athiya Shetty Getting Married)

अथियाचा लहान भाऊ अहान शेट्टी याच्या 'तडप' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हे दोघे एकत्रच आले होते. दोघांनी मुंबईत नवे घरही घेतले असून लग्‍नानंतर तिथेच ते संसार थाटणार असल्याचे म्हटले जाते. सध्या या घराच्या इंटेरिअरचे काम सुरू आहे. दोघे कधी लग्‍न करणार याची कोणतीही अधिकृत माहिती दोघांच्याही कुटुंबीयांनी दिलेली नाही. मात्र, दोन्ही कुटुंबांनी लग्‍नाची तयारी सुरू केल्याचे समजते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news