विधानसभा अध्यक्ष कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत : देवेंद्र फडणवीस

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा अध्यक्षांवर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या प्रकारात बसत नाही. मला वाटतं की अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. अध्यक्ष हे स्व:त वकील आहेत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या नुसार व जे कायद्यात आहे त्यानुसारच अध्यक्ष योग्य वेळेत निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंना नैतिकतेची भाषा करण्याचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला दिले. आज माध्यमांशी ते बोलत होते.

शरद पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया

"शरद पवार आणि नैतिकतेचा संबंध आहे का? आता जर पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवण्याचं ठरवलं तर कठीणच जाईल, शिवाय इतिहासात जावं लागेल. वसंत दादांच सरकार कसं गेलं इथपर्यंत मागे जावं लागेल. पवार ज्येष्ठ नेते आहेत, ते बोलत असतात, जाऊ द्या फार लक्ष द्यायचं नसतं," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर दिली.

आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत: राज ठाकरे

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरूवारी दिलेला निकाल संभ्रमात टाकणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे काय होणार ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी २०२४ च्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज (दि. १२) मीरा भाईंदर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news