पुढारी ऑनलाईन : चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या १०० मीटर T-३५ स्पर्धेत नारायण ठाकूर याने आणखी एक कांस्यपदक जिंकले. त्याने या स्पर्धेत १४.३७ सेकंदाची वेळ नोंदवली. नारायण ठाकूर याचे पॅरा गेम्समधील हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने पुरुषांच्या २०० मीटर T-३५ मध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.
तसेच भारताच्या श्रेयांश त्रिवेदी यानेही आज दुसरे पदक जिंकले. त्याने पुरुषांच्या 100 मीटर T-37 फायनल स्पर्धेत १२.२४ सेकंद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले.
संबंधित बातम्या
तिरंदाजीत पुरुष दुहेरीत आदिल मोहम्मद नझीर अन्सारी आणि नवीन दलाल यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यांनी कांस्यपदकाच्या लढतीत कझाकस्तानच्या नुरशत आणि सगदत या जोडीला १२५-१२० असे पराभूत केले. आदिल आणि नवीनचे तिरंदाजीतील हे दुसरे कांस्यपदक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नारायण ठाकूर यांचे चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या २०० मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते.