पुढारी ऑनलाईन डेस्क : हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सोमवारी (दि. 25) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा तिने इतिहास रचला. भारतासाठी आजपर्यंत कोणतीही महिला कर्णधार जे करू शकली नाही, ते हरमनप्रीतने केले आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सामने खेळले होते, पण बंदीमुळे ती खेळू शकली नाही. पण श्रीलंकेविरुद्ध अंतिम फेरीत टीम इंडियाची कर्णधार म्हणून मैदानात उतरताच तिने नवा विक्रम रचला.
हरमनप्रीतने (Harmanpreet Kaur) सोमवारी 100 व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. अशी कामगिरी करणारी ती जगतील दुसरी तर भारताची पहिली महिला कर्णधार ठरली आहेत. तिच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने हा पराक्रम आपल्या नावानर नोंदवला आहे. हरमनप्रीतने 100 सामन्यांपैकी 57 जिंकले असून 38 गमावले आहेत. तर मेग लॅनिंगने 100 टी-20 सामन्यांपैकी तिने 76 जिंकले असून 18 गमावले आहेत. हरमनप्रीत व्यतिरिक्त, मिताली राजने (32 सामने) सर्वाधिक टी-20 सामन्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला महिला क्रिकेट संघाने सुवर्ण पदकावर नाव कोरले. अंतिम सामना श्रीलंकेच्या महिला संघाचा 19 धावांनी पराभव करून टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 116 धावा केल्या. यानंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 20 षटकांत 97 धावांवर गारद केले. भारतातर्फे 18 वर्षीय तीतास साधूने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या फलंदाजीत जेमिमाह रॉड्रिग्जने 42 धावांची तर स्मृती मंधानाने 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.